मतदारसंघ सांभाळता आला नाही त्या महाराष्ट्र काय सांभाळणार?; संजय काकडेंची पंकजा मुंडेंवर घणाघात

महाराष्ट्र News 24 वृत्त

घरात एक मंत्रिपद, एक खासदार असताना आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्र काय सांभाळणार? अशी घणाघाती टीका खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली. 

Image result for sanjay kakade pankaja munde"

पंकजा मुंडे यांच्या कालच्या सभेचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटायला सुरवात झाली आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणाचा जोरदारसमाचार घेतला. पक्षाला ब्लॅकमेल करून काहीतरी आपल्या पदरात पडून घेण्याची ही रणनीती असल्याचे ते म्हणले. पाच वर्ष कोणालाही जवळ केले नाही. मराठवाड्याच्या प्रश्नावर कधी काम केले नाही. आता तुम्हाला जातीपातीचा नि मराठवाड्याचा पुळका आला. तुमचा हेतू सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात काकडेंनी पंकजा मुंडेंवर प्रहार केला. आता संजय काकडे यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे कोणता पलटवार करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत