मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची संधी हे मॅगसेसेपेक्षा भाग्याचे – डॉ.भरत वाटवाणी

नेरळ : रायगड माझा वृत्त 

देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात 15 ऑगस्ट 1947च्या लालकिल्यावरील मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाला वेगळे महत्व आहे.तशी संधी हुतात्मा स्मारक समितीने उपलब्ध करून दिली हे भाग्य मॅगसेसे पुरस्काराएवढेच महत्वाचे आहे असे प्रतिपादन रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ भरत वाटवाणी यांनी केले.नेरळ येथे मध्यरात्री झेंडा फकडविल्यानंतर ते तरुणांशी बोलत होते.

नेरळ येथे कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या हुतात्मा चौकात मध्यरात्रीचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्या ठिकाणी 12 वाजून 1 मिनिटांनी राष्ट्रीय झेंडा तिरंगा जागतिक कीर्तीचे मानसोपचार तज्ञ डॉ भरत वाटवाणी यांच्या हस्ते फडकविण्यात आला. त्यावेळी नेरळ गावातील माध्यमिक शाळांमधून दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या वृष्टी मिलिंद साने या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने डॉ.भरत वाटवाणी यांचा सत्कार नेरळच्या सरपंच सुवर्णा नाईक यांचे हस्ते करण्यात आला.तर झी युवा वरील संगीत सम्राट कार्यक्रमात स्पर्धक असलेल्या प्राप्ती विवेक दहिवलीकर या तरुणीचा देखील सत्कार करण्यात आला.
हुतात्मा चौकात मध्यरात्र असून देखील 700-800 तरुणांना मार्गदर्शन करताना डॉ भरत वाटवाणी यांनी मध्यरात्री तिरंगा फडकविण्याचा संधी मिळण्यासाठी भाग्य लागते,ते भाग्य रॅमन मॅगसेसे पेक्षा मोठे आहे.हुतात्मा,स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांनी देश स्वातंत्र्य केला म्हणून मला मॅगसेसे पुरस्कार मिळाला,त्यामुळे येथे येणे ही प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.कर्जत तालुक्यातील दोन्ही हुतात्म्यांच्या कार्याने प्रेरित होऊन मनाशी पक्की खूणगाठ बांधली आणि कर्जत मध्ये आमचे कार्य सुरू झाले.गावाच्या बाहेर मध्यरात्री शेकडो तरुण आज दिसत आहे,एक दिवस असा येईल संपूर्ण परिसर हजारो नागरिकांनी भरलेला असेल असा विश्वास डॉ वाटवाणी यांनी स्मारक समितीचे काम पाहून व्यक्त केला.आपण स्मारक समितीने बोलविले नाही तर दरवर्षी येत राहू असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
रॅमन मॅगसेसे विषयी बोलताना त्यांनी आपला 1989 पासूनचा इतिहास कथन केला.त्यावेळी अनेक तरुणांनी डॉ वाटवाणी यांना प्रश्न विचारून त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
यावेळी नेरळचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,वन अधिकारी नारायण राठोड,पोलीस उपनिरीक्षक रणजित मोहिते,नेरळ चे उपसरपंच अंकुश शेळके, आदीसह मान्यवर उपस्थित होते.त्याआधी हुतात्मा चौकातून मशाल फेरी काढण्यात आली,मशालफेरीच्या अग्रभागी कोतवालवाडी ट्रस्टचे विद्यार्थी तसेच नेरळ गावातील तरुण होते.तर धामोते,पाडा,भागातील तरुणांनी बाईक फेरीने येत हुतात्मा चौक गाठले.स्मारक समितीच्या वतीने संतोष पेरणे,दर्वेश पालकर,गणेश पवार,अजय गायकवाड,दीपक पाटील,सुमित क्षीरसागर,ऍड हृषीकेश कांबळे,आदीनी सर्वांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले.
त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे,राजेश मिरकुटे,केतन पोतदार,माजी उपसरपंच सुमन लोंगले,बल्लाळ जोशी,भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी,शिवसेना उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे,तसेच माजी विभागप्रमुख भाई देसाई,विभागप्रमुख प्रभाकर देशमुख,सेनेचे संपर्कप्रमुख किसन शिंदे,सेनेचे उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर,काँग्रेस तालुका अध्यक्ष अरविंद कटारिया, भाजपचे तालुका चिटणीस मिलिंद साने,माजी मुख्याध्यापक प्रभाकर चासकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष निकेश म्हसे,तसेच संतोष शिंगाडे,श्याम कडव,आदींसह शेकडो तरुण उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत