मध्य प्रदेशमध्ये 18 गायींचा गारठ्याने मृत्यू

भोपाळ : रायगड माझा ऑनलाईन

मध्य प्रदेशमधील आगर माळवामध्ये 18 गायींचा गारठ्याने मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी अजय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व गायींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्याचा फटका प्राण्यांनानाही बसताना दिसत आहे. या कडाक्याच्या थंडीतच 18 गायींचा मृत्यू झाला आहे. मृत गाईंना जर कुठला आजार असेल तर त्याची लागण इतर गायींना होऊ यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच थंडीचा गारठा कमी होण्यासाठीही उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत