मध्य प्रदेशात EVM चा गोंधळ, संभ्रमामुळे मतमोजणी थांबवली

भोपाळ : रायगड माझा ऑनलाईन 

मध्य प्रदेशात EVM चा गोंधळ, संभ्रमामुळे मतमोजणी थांबवली

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना मध्य प्रदेशात मात्र गोंधळ पाहायला मिळाला. एका बूथवरील चार ईव्हीएमच्या संभ्रमामुळे त्या बूथवरील मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

संबंधित बूथवरील चार ईव्हीएम या अजूनही वोटिंग मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. वास्तविक मतदान झाल्यानंतर या ईव्हीएम बंद करणं गरजेचं असतं. या सर्व गोंधळामुळे त्या बूथवरील मतमोजणी काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

कोणत्या राज्यात काही स्थिती आहे?

तेलंगणा निकाल अपडेट्स : टीआरएस-89, काँग्रेस -21, इतर-9 जागांवर आघाडीवर

मध्य प्रदेश निकाल अपडेट्स : भाजप -108, काँग्रेस -112, इतर-10 जागांवर आघाडीवर

राजस्थान निकाल अपडेट्स : भाजप -79, काँग्रेस – 99, इतर -21 जागांवर आघाडीवर

मिझोराम निकाल अपडेट्स : एमएनएफ-25, काँग्रेस -6, इतर- 9 जागांवर आघाडीवर

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता होती, या तिन्ही ठिकाणी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या गडाला भगदाड पडले आहे.

तेलंगणात सत्ताधारी टीआरएसने बहुमताकडे वाटचाल सुरू केली असली तरी जुन्या हैदराबादमधल्या सर्व सात पैकी 5 जागांवर असदुद्दीन ओवेसींच्या ‘MIM’ने आघाडी घेतलीय. या सातही जागांवर ओवेसींचा प्रभाव आहे. मागच्या निवडणुकीत ‘MIM’ला 6 जागा मिळाल्या होत्या. सकाळी 10.30 वाजेपर्यंत सत्ताधारी टीआरएसची तब्बल 90 जागांवर आघाडी होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत