मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही सपा-बसपा यांची आघाडी

 लखनौ : रायगड माझा वृत्त 

उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांतही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी आघाडी केल्याची घोषणा केली. मध्य प्रदेशात लोकसभेच्या 29 तर उत्तराखंडामध्ये ५ जागा आहेत. मध्य प्रदेशात 29 पैकी 26 जागा बसपा लढणार आहे तर ३ जागा सपा लढवणार आहे, तर उत्तराखंडमध्ये बसपा ४ जागा लढवणार असून सपा एका जागा लढणार आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच बसपा-सपा यांनी या दोन्ही राज्यांतही काँग्रेसला दूर ठेवले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत