मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडे

कल्याण : रायगड माझा वृत्त 

शहाड-कल्याण दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक अर्धा तासापासून विस्कळीत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्गाची मंगळवारची सकाळ पुन्हा एकदा लेटमार्कने झाली आहे.

रेल्वे रुळाला तडे गेल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र अद्याप वाहतूक उशिराने सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत