मध्य रेल्वे धिम्यागतीने, प्रवासी वैतागले

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मध्य रेल्वेच्या कल्याण-मुंबई मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच 15-20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे नोकरदारवर्गाचे हाल सुरू आहेत. मात्र गाड्या उशिराने धावण्याचे कारण अद्याप रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

भीम सैनिकांनी देखील व्यक्त केली नाराजी

आज महापरिनिर्वाण दिन असल्याने लाखोंच्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र उपनगरीय गाड्या उशिराने धावत असल्याने गाड्यांना नेहमीपेक्षा जास्त गर्दी होत आहे. त्यामुळे दूरून आलेल्या भीमसैनिकांची गैरसोय होत असल्याचे म्हणणे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत