मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मोटरमेन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत मोटरमेन ओव्हरटाइम करणार नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.

आज कार्यालय गाठताना मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला होता. आता घरी जातानाही असाच त्रास मुंबईकरांना सहन करावा लागू शकतो. मोठ्या प्रमाणावर गर्दीचा सामना मुंबईकरांना करावा लागला होता. तसेच अनेक लोकल्स रद्द झाल्याने जवळच्या अंतरावर जाण्यासाठीही वेळ लागत होता. जर रेल्वे अधिकारी आणि मोटरमन यांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही.

आत्तापर्यंत मध्य रेल्वेवरील नऊ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून वाहतूक १५ ते २० मिनिटाने उशिरा सुरु होती. ज्याचा प्रचंड मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागला. मोटरमेनच्या २२९ रिक्त जागा भरा, सिग्नल नियम मोडल्यास मोटरमनला कामावरुन कमी करण्याचा नियम मागे घेण्यात यावा, अशा मागण्या करत मध्य रेल्वेवरील मोटरमनकडून शुक्रवारी ओव्हरटाईम न करता नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला. मात्र मोटरमेन आणि रेल्वे अधिकारी यांच्या बैठकीत अद्यापही तोडगा निघालेला नाही. ज्याचा फटका मुंबईकरांनाच बसू शकतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत