मनमाड-येवला मार्गावर अपघात, एकाच कुटुंबातील सहा ठार

नाशिक : रायगड माझा वृत्त 
येवला-मनमाड मार्गावर अनकाई बारी इथं भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन महिला, दोन पुरुष तसंच एका लहान मुलाचा समावेश आहे.
सकाळी पाच ते साडेपाचच्या सुमरास हा भीषण अपघात झाला. आयशर ट्रक आणि एर्टिगा कार यांची जोरदार धडक झाल्यानं हा अपघात घडला आहे.
मृत्युमुखी पडलेले नगर जिल्ह्यातील रहिवाशी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की; कारचा समोरील भाग संपूर्ण चक्का चुर झाला आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत