मनमाड रेल्वे स्थानकात रुळाला तडा, मोठा अपघात टळला

नाशिकः रायगड माझा वृत्त

मनमाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर रुळाला तडा गेल्याचं लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे. काचीगुडा- शिर्डी – काकी नाडा एक्सप्रेस येण्यापूर्वी काही मिनिटे आधी रेल्वे रुळाला मोठा तडा गेल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं काकीनाडा एक्सप्रेस रोखण्यात आली.
सकाळी सातच्या सुमारास काकी नाडा एक्सप्रेस मनमाड स्थानकात येण्यापूर्वी रेल्वेरुळांची पाहणी करणाऱ्या गँगमनना रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधितांना माहिती दिली. काकी नाडा एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात येण्यापूर्वीच रोखण्यात आली, रेल्वे रूळ जोडण्याचे काम तातडीने करण्यात आले व नंतर रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. थंडीमुळं रुळाला तडा गेल्याचं रेल्वे प्रशासनानं प्राथमिक पाहणीनंतर स्पष्ट केलं आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत