मनसेचे आमदार शरद सोनावणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांकडून ब्रेक

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for sharad sonawane

मनसेचे एकमेव असलेले आमदार शरद सोनावणे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जुन्नर मतदार संघात जोरदार सुरु आहे. मात्र शरद सोनावणे यांच्या शिवसेना प्रवेशावर जुन्नर मधील शिवसैनिकांनी ब्रेक लावला आहे. पक्षप्रमुखांनी आमदार शरद सोनवणे किंवा अन्य आयात उमेदवार लादल्यास आम्ही पदाचे सामुदायिक राजीनामे देऊ. पक्षाचे काम करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

मनसेचे आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. याबाबत जुन्नर येथील शिवसैनिकांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नारायणगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीमध्ये मनसेचे आमदार शरद सोनावणे यांना शिवसेनेत प्रवेश दिला आणि ते जर शिवसेनेचे उमेदवार असतील तर आम्ही सामुदायिक राजीनामे देवू तसेच पक्षाचे काम देखील करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

यावेळी कार्यकर्त्यांनी आशा बुचके यांची जुन्नर मतदार संघातून उमेदवारी घोषित करण्याची मागणी देखील उचलून धरली आहे.त्यामुळे मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार शरद सोनावणे यांना उमेदवारी मिळते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.ब्युरो

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत