मनसेच्या कार्यकारिणीतून शिशिर शिंदेंना डच्चू

 

रायगड माझाचं  वृत्त खरं  ठरणार

मुंबई :रायगड माझा

रायगड माझाचं  वृत्त खरं  ठरणार  . शिशिर शिंदे पुन्हा शिवसेनेचा झेंडा हाती  वृत्त रायगड माझाने १७ मे  ला प्रसिद्ध केले होते.   मनसेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे मनसेनंही त्यांना आताच रामराम ठोकलाय. मनसेनं आपल्या नवीन कार्यकारिणीतून शिशिर शिंदेंना डच्चू दिलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत औपचारिकरित्या निवडणूक घेण्यात आली असून नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. यात शिशिर शिंदे वगळता इतर नेते आणि सरचिटणीस यांना कायम ठेवण्यात आलंय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पक्षाध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली असून १० नेते तर १२ सरचिटणीस अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

शिशिर शिंदे यांची घरवापसी,  आज  शिवसेना प्रवेशाची शक्यता

नेत्यांमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिदोरे यांचा समावेश आहे. तर मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, संदीप देशपांडे, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. शिशिर शिंदे यांचं नाव वगळल्याने शिंदे हे शिवसेनेत जाणं ही फक्त औपचारिकता मानली जातीये.

शेयर करा

One thought on “मनसेच्या कार्यकारिणीतून शिशिर शिंदेंना डच्चू

  1. शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकर यांच्या सारख्या कर्तबगार व लोकप्रिय नेत्यांनी शिवसेना सोडून स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेतला. आजही या दोघांना शिवसैनिक आपले मानतात व बहुतेक सर्व शिवसेना नेतेसुद्धा आजही त्यांच्या संपर्कात आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेनेवर कितीही आगपाखड केली असली तरी या दोघांनी कधीच शिवसेनेबद्दल व उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत. हीच परिस्थिती श्री गणेश नाईक यांच्याबद्दल सुद्धा आहे. या तिघांनी सन्मानपूर्वक शिवसेनेत परत यावे व शिवसेनेनेसुद्धा त्यांना पूर्वीचाच बहुमान प्रदान करावा. यातच मराठी जनतेचे भले आहे व तशी सर्व
    शिवसैनिकांची इच्छा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत