मनसेला धक्का; बाळा नांदगावकरांचे निकटवर्तीय ‘शिवबंधना’त

मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडल्यानंतर आता मनसेच्या नाराज पदाधिकाऱ्यांनीही शिवबंधन हाती बांधायला सुरुवात केली आहे.

MNS leader vijay lipare who clesed to bala nandgavkar join shivsena | बाळा नांदगावकरांच्या निकटवर्तीयाची मनसेला सोडचिठ्ठी, बांधलं 'शिवबंधन'

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडल्यानंतर आता मनसेच्या नाराज पदाधिकाऱ्यांनीही शिवबंधन हाती बांधायला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि भायखळ्यातील विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी आज अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

मनसेत असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे मुंबई मनपा निवडणुकीत लिपारे यांचे तिकीट कापले गेले होते. तेव्हापासून लिपारे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांनी भायखळा विधानसभा मतदार संघातून लढावे, यासाठीही लिपारे यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ते नाराज झाले होते. मनसेला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे भवितव्य दिसत नसल्याने लिपारे यांनी आज सकाळी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत