मनसे तर्फे वाढीव वीज बिलांविरोधात राज्यस्तरीय मोर्चा

नवी मुंबई : साईनाथ भोईर (प्रतिनिधी)

आज मनसे तर्फे वाढीव वीज बिलांविरोधात राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येत आहे. नवी मुंबईतील कोकण भवन वर देखील मनसे तर्फे मोर्चा काढत वाढीव वीज बिलाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक वेळा निवेदन देऊन वीज बिल वाढी संदर्भातील सामान्य नागरिकांच्या भावना पोहचवून देखील सरकार फक्त आश्वासने देण्यात मग्न आहे. सरकारच्या या वेळ काढूपणा विरोधात सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप असून हा संताप सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्य सरकारने वाढीव विजबिलांसंदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत