मनसे-शिवसेनेत वाद विकोपाला ? शुभ बोल रे नाऱ्या…! राज ठाकरेंवर शिवसेनेची बोचरी टीका

महाराष्ट्र News 24 वृत्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी शुभ बोल रे नाऱ्या…या शब्दात राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. राज्य सरकार चांगलं काम करतंय, त्याचं कौतुक केले पाहिजे असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
 हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय, माझी इच्छा नाही हे सरकार पडावं पण तीन पक्षाचं सरकार आहे, एकमेकांना विचारलं जात नाही, त्यामुळे हे टिकेल वाटत नाही, सरकारमधील पक्षांमध्ये विसंवाद आहे हे प्रखरतेने दिसून येते असं राज ठाकरे एका वाहिनीवर बोलताना म्हणाले होते.
त्यावर सुभाष देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंच्या टीकेवर बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, शुभ बोल रे नाऱ्या एवढचं मी म्हणेन, सरकार चांगले काम करत आहे, त्यावर चांगले बोललं पाहिजे, सरकार जनतेच्या पाठिशी उभं आहे. आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजे, त्यातील कमतरता भरुन काढू, पण चांगल्या कामाचंही कौतुक करावं असं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या टीकेला ‘शुभ बोल रे नाऱ्या ‘अशा बोचऱ्या शब्दात  उत्तर देणाऱ्या सुभाष देसाई यांना मनसेकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पहावे लागेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत