मनोहर पर्रीकर साडेतीन महिन्यांनंतर सचिवालयात

पणजी : रायगड माझा ऑनलाईन 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर साडेतीन महिन्यांनंतर मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पर्रीकर कॅन्सरच्या आजाराशी लढा देत आहेत.  उपचार घेत असल्‍यामुळे पर्रीकर घराबाहेर पडू शकत नव्हते. त्यामुळे दोनवेळा त्यांनी आपल्या करंजाळे येथील खासगी निवासस्थानीच मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या होत्या. गत वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ते शेवटचे सचिवालयात आले होते. ते मंगळवारी सकाळी सचिवालयात पोहचले. पर्रीकर येणार असल्याची कल्पना पर्रीकर  यांच्या कार्यालयातील मोजक्‍याच कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. पर्रीकर सचिवालयात पोहोचताच कर्मचाऱ्यांनी त्‍यांचे स्वागत केले.

पर्रीकर सध्या आपल्या निवासस्थानातच आराम करत असल्याने प्रशासनावर विपरित परिणाम होत असल्‍याची टीका विरोधकांकडून होत आहे. परंतु, त्‍यांनी घरातूनच राज्‍याचे कामकाज सांभाळले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत