ममतांचे ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ अभियान

कोलकाता :रायगड  माझा 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाविरोधात ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ अभियानाची घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून आपली भाजपविरोधी लढाई सुरू होईल असेही ममतांनी जाहीर केले आहे.

भाजपवर हल्ला चढवताना ममता म्हणाल्या की, देशात प्रत्येक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत आहेत. ते लोक लोकांमध्ये तालिबानी प्रवृत्ती निर्माण करत आहेत. भाजप आणि आरएसएसमध्ये काही चांगले लोकही आहेत आणि मी त्यांचा सन्मानही करते, मात्र ते काही घाणेरेडे खेळही करत असतात.

यावेळी बोलताना ममतांनी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागा जिंकण्याचाही दावा केला. पश्चिम बंगाल बदला घेईल, असेही त्या म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्यातील सभेला संबोधित करताना टीएमसी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या सरकारला त्यांनी सिंडिकेट असे संबोधले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत