ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवा; सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्ला

रायगड माझा वृत्त 

लोकसभा निवडणुकीच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी घराण्यातील व्यक्ती अध्यक्षपदी नसावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांची बरीच समजूत काढल्यानंतरही ते आपल्या निर्णयावर ठाम राहीले. प्रियंका गांधी तसेच राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम यांनी देखील त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

'या' महिलेला काँग्रेस अध्यक्ष बनवा, सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्ला

आता काँग्रेस पार्टी अध्यक्ष पदाची धुरा संभाळणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहे. यावर देशभरातून अनेक नावे समोर येत आहेत. दरम्यान राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामींनी यावर काँग्रेसला सल्ला दिला आहे. सुब्रह्मण्यम स्वामींनी शुक्रवारी एका ट्वीटमध्ये हा सल्ला दिला. तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनिकरण करायला हवे असे सुब्रह्मण्यम स्वामींनी म्हटले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवायला हवे असा सल्लाही त्यांनी दिला. इटालियन्स आणि वंशजांना पार्टी सोडायला सांगा. तरच ममता बॅनर्जी अध्यक्ष होऊ शकतील. भारतीय जनता पार्टी हा एकच पक्ष राहीला तर लोकशाही धोक्यात येईल. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकीकृत काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभाग संभाळावा असे सुब्रह्मण्यम स्वामींनी म्हटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील यात समाविष्ट होण्याचा सल्ला त्यांनी दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत