मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, ८ जणांचा मृत्यू; राज्यात १५ जणांचे बळी

 

रायगड माझा वृत्त 

औरंगाबाद-राज्यात गुरुवारी विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस झाला. विजा कोसळण्याच्या विविध घटनांत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला. एकट्या मराठवाड्यात आठ जणांचा बळी गेला.

नांदेड : मलकापूर (ता.किनवट) हेमंत (१०) व शालिनी लवसिंग जाधव (८) या बहीण भावाचा वीज कोसळून अंत झाला. कंधार तालुक्यात चुडाजीची वाडी येथे गोठ्यात जनावरे बांधत असलेला विक्रम उद्धव मुंडकर (२७) व देगलूर तालुक्यात केदारकुंठा येथील शेतकरी मारोती केशवराव बाराळे (५०) हे झाडाखाली थांबले असताना वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
लातूर :जळकोट तालुक्यातील मरसांगवी गावात वसीम भांडे (१७) याचा विजेने मृत्यू झाला. औसा तालुक्यात कन्हेरीत शेतकरी सुभाष लिंबाजी चव्हाण (६०) हे विजेच्या तडाख्यात ठार झाले.
उस्मानाबाद : वाणेवाडी शिवारात शेतकाम करत असलेल्या ५ महिलांवर वीज कोसळली. यात शालूबाई पवार (४५), शीतल घुटुकडे (३५) यांचा मृत्यू झाला. तीन महिला जखमी झाल्या.

बुलडाणा :माटरगाव (ता.शेगाव) येथे वीज कोसळून सय्यद इलीयाज (४५), मुलगी रुक्सानाबी (१५) हे ठार झाले.
जळगाव :बाेदवड तालुक्यातील फरकांडे शिवारात रतन देवीसिंग िभल (५५) यांचा वीज पडून मृत्यू.
नाशिक : चांदवड तालुक्यातील िपंपळगाव धाबळी येथे वीज पडून गंगाराम जाधव (४८) यांचा मृत्यू
सोलापूर : करमाळा तालुक्यातील हुलगेवाडी कोर्टी येथे दुपारी ३.३० वाजता वीज कोसळून गंगाराव वाघमारे (२८) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सांगोला तालुक्यात नाझरे गावात बुधवारी रात्री ८ वाजता वीज कोसळून विलास भारत भंडारे (२८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
नगर :धालवडीतील (ता. कर्जत) येथील अरुण भीमराव चव्हाण (४५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत