मराठा अारक्षण: सिल्लाेडचे अामदार सत्तार यांचाही राजीनामा; विधिमंडळ सचिवांकडे दिले पत्र

 

रायगड माझा वृत्त 

सिल्लाेड-मराठा, मुस्लिम, धनगर, काेळी या समाजाच्या अारक्षणाबाबत फडणवीस सरकार ठाेस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ सिल्लाेड (जि. अाैरंगाबाद) येथील काँग्रेसचे अामदार अब्दुल सत्तार यांनी साेमवारी अापल्या पदाचा राजीनामा विधिमंडळाच्या प्रधान सचिवांकडे सुपूर्द केला. काँग्रेसच्या सर्व अामदारांंची मुंबईत बैठक झाली. त्यात अनेक अामदारांनी राजीनामा देऊन सरकारवर दबाव वाढवण्याची सूचना केली हाेती. त्यासाठी पक्षश्रेष्ठींची परवानगीही घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. मात्र यानंतर काही वेळातच अामदार सत्तार यांनी राजीनामा सादर केला.

यापूर्वी जिल्ह्यातील २ अामदारांचे राजीनामे
यापूर्वी अाैरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे हर्षवर्धन जाधव (शिवसेना) व वैजापूरचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी) या अामदारांनीही मराठा अारक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांना राजीनामे दिले अाहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत