मराठा आंदोलनातल्या निरपराधांवरील गुन्हे मागे घ्या, शरद पवार यांचे पत्र

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान निरपराध व्यक्तींवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मराठा क्रांती आंदोलनाच्या वेळी कामोठे-कळंबोली येथील निरपराध व्यक्तींवर कलम 307 व इतर गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केल्याचे निवेदन या भागाच्या दौऱ्यादरम्यान येथील आंदोलकांनी आपल्याकडे दिले होते, असे पवार यांनी या पत्रात नमूद केले आहे. या आंदोलनात डॉक्टर, वकील, नोकरदार महिला सहभागी होत्या.

शांततापूर्ण आंदोलनात अशा सुजाण नागरिकांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतील ही बाब पटण्यासारखी नाही, असे पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींच्या यादीसह निवेदन आपणाकडे पाठवत असून घटनेतील सर्व व्यक्तींची योग्य चौकशी होऊन निरपराध व्यक्तींवरील गुन्हे मागे घेतले जातील अशी राज्याचे प्रमुख म्हणून आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो, असेही पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत