मराठा आंदोलनाला हिंसक वळण..गंगाखेडमध्ये एसटी बससह पोलिस व्हॅन जाळली, पोलिसांचा लाठीचार्ज

– मराठा आरक्षणः बारा वाहनांची नासधूस, पोलिस व्हॅनसह एक बस जाळली

परभणी: रायगड माझा 

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुकारण्यात आलेल्या सोमवारच्या (ता.23) गंगाखेड बंदला हिंसक वळण लागले. जमावाने आठ एसटी बसेससह चार खासगी ट्रॅव्हल्स आणि पोलिसांच्या वाहनांची नासधूस केली. संतप्त आंदोललकांनी पोलिस व्हॅनसह एक एसटी बस जाळली. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. या घटनेमुळे गंगाखेड शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी दगडफेकीचे प्रकार सुरू आहेत. परभणी दोन दिवसांपूर्वी आठ बसेसवर जमावाने दगडफेक करून मोठे नुकसान केले होते.

सोमवारी मऱाठा क्रांती मोर्चाने गंगाखेड बंदचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सकाळपासूनच गंगाखेडमधील बाजारपेठ कडकडीत बंद होती. सकाळी दहाच्या सुमारास सकल मराठा समाजातील नागरिक श्रीराम चौकात एकत्रीत आले. आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत त्यांनी महाराणा चौकात रास्ता रोको केला. तेथेच ठ़िय्या आंदोलन करण्यात आले. या दरम्यान,

परभणीहून लातूरकडे जाणार्‍या बसवर सकाळी 11 च्या सुमारास माजी आमदार घनदाट यांच्या निवासस्थानासमोर रोखून त्यातून प्रवाशांना खाली उतरवले व ती बस पेटवून देण्यात आली.

तसेच परळीहून गंगाखेडकडे येणार्‍या सहा बसेसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. यात बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुणे येथून नांदेडकडे जाणार्‍या खुशाल, साई, समई या चार ट्रॅव्हल्स अडविण्यात आल्या. जमावाने ट्रॅव्हल्सवरही दगडफेक करीत काचा फोडल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत