नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेत उपस्थित केला. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मार्गी लावावी, अशी मागणी राज्यसभेत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली. तर लोकसभेत कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याची मागणी केली.
सरकारने मराठा मोर्चा आंदोलनाची दखल घ्यायला हवी. या विषयावरून राजकारण न करता सर्व पक्षांना एकत्र बोलावून तोडगा काढावा. मराठा समाजाच्या मागण्या मार्गी लावल्या तर आंदोलनाची तीव्रता वाढणार नाही, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नमूद केले.
शेयर करा