मराठा आरक्षणावरून भाजप आमदाराचा देखील राजीनामा !

नाशिक : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आहेर यांनी मराठा आंदोलकांकडे राजीनामा सोपवला असून समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा, असे त्यांनी म्हटले आहे. वेळप्रसंगी समाजासाठी बलिदान द्यायलाही तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे याचे आंदोलन जोमात आहे. त्यात बुधवारी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव  आणि राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी काल आरक्षणाला पाठींबा म्हणुन विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर या मागणीसाठी राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे.  आज भारतीय जनता पक्षाचे चांदवड- देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहूल आहेर यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा हा पहिलाच राजीनामा ठरण्याची शक्‍यता आहे.

काकासाहेब शिंदे या आंदोलकाच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलनाचे स्वरूप तीव्र झाले असून नाशिकमधील चांदवड- देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहूल आहेर यांनी गुरुवारी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टातून उचित निर्णय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.