मराठा आरक्षणासाठी आणखी एकाच बळी; गळफास घेऊन केली आत्महत्या!

बीड : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षण मागणीचा जिल्ह्यात आणखी एक बळी गेलाय. अभिजित देशमुख या पस्तीस वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केलीये.

विज्ञानातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेला अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होता. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर बँकेचे कर्जही थकीत होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याचे तो मित्रांशी बोलत होता. दरम्यान, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला. आरक्षण मागणीसाठी सहा बळी गेल्यानंतर “मी देखील या लढाईतील शिपाई असून बलिदान देणार” असल्याचे त्याने सोमवारी रात्रीही बोलून दाखविले होते असे डॉ. धनराज पवार यांनी सांगितले.

अभिजित देशमुख याने मंगळवारी सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. केज पोलीस ठाण्याचे जमादार ढाकणे यांनी पंचनामा लेला असून त्यातही तसा उल्लेख आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत