मराठा आरक्षणासाठी पुकारलेला मुंबई बंद अखेर स्थगित

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणासाठी पुकारलेला मुंबई बंद अखेर स्थगित करण्यात आला आहे. मराठा क्रांती सकल मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी आज (25 जुलै) दुपारी दादरमध्ये पत्रकार परिषद घेऊन बंद स्थगित केल्याची घोषणा केली. तसंच ठाणे आणि नवी मुंबई बंदही स्थगित करण्याचं आणि शांततेचं आवाहन समन्वयकांनी आंदोलकांना केलं आहे.

सरकारने दोन वर्ष मराठा समाजाची पिळवणूक, फसवणूक केली. त्यामुळे आता मूक नाही तर ठोक मोर्चा काढण्याचा निर्धार केला. मराठा समाजाचा अपमान आणि अन्यायाविरुद्ध हा बंद पुकारल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं.”सरकारमुळे आमच्या हातात दगड, काठ्या आल्या. काही जणांना त्रास झाला, त्यांची क्षमा मागतो, पण सरकारने याची दखल घ्यायला हवी. राजकीय हेतूने बंद पेटल्याचा संशय आहे,” असंही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत