मराठा आरक्षणासाठी म्हसळा तहसील कार्यालयावर मोर्चा

म्हसळा : निकेश कोकचा 

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरु असलेल्या मराठा आंदोलनाची धग अद्याप कायम असल्याची म्हसळ्यात दिसण्यात आले.म्हसळ्यातील मराठा समाजानी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून शहरभर मोर्चाचे आयोजन केले.
आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बंधू भगिनी मोर्च्यांत सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजानी सरकार व मुख्यमंत्री यांवर जोरदार घोषणा बाजी केली.जोपर्यत मराठयांना आरक्षण भेटत नाही तोपर्यत मराठा समाज गप्प बसणार नाही असा इशारा त्यावेळीस दिला.गेली पंधरा ते विस वर्ष मराठा आरक्षणावरून राजकारण खेळले गेले.कोणाचाच विरोध नसतानाही यापूर्वी आरक्षण का दिले गेले नाही,इतकी वर्षे मराठा आरक्षणाचा मुद्दा का प्रलंबित ठेवला गेला असे प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आले.
यापुढे कोणताही अनुसूचित प्रकार घडण्यापूर्वीच या सरकारने तातडीने निर्णय करावा असा इशाराही त्यावेळीस मराठयांनी दिला.अट्रोसिटी कायद्याबाबत विधेयक मंजूर करण्यात मोदी सरकारने जी तत्परता दाखवली,तीच मराठा आरक्षणासाठी फड़नवीस सरकारने दखवावी.अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोर्च्यांत नंदू शिर्के,वैशाली सावंत,संतोष (नाना) सावंत,रवींद्र दळवी,किरण पालांडे,बाबू शिर्के,सचिन महामुनकर, अमित महामुनकर,मुरलीधर महामूनकर,व्यंकटेश सावंत,जयवंत सावंत आदि मान्यवरांच्या उपस्थितीत तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन देण्यात आले.मात्र म्हसळ्यात बंद पाळण्यात आला नाही सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत