मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये शिक्षकाची आत्महत्या

लातूर : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. आज लातूर जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मुलाला नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या शिक्षक बापाने आज सकाळी आत्महत्या केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुलाला चांगले शिक्षण देऊन, त्याच्या शिक्षणासाठी खर्च करुनही नोकरी मिळत नसल्याने लातूर तालुक्यातील माटेफळ येथील रमेश पाटील तणावग्रस्त होते. मुलाला नोकरी नाही, सरकार आरक्षण देण्यात दिरंगाई करत असल्याने मुलाचे काय होणार याची चिंता त्यांना सतावत होती. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. आपली लेकरं हुशार असूनही आरक्षण नसल्याने घरीच असल्याची खंत त्यांनी यात व्यक्त केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत