मराठा आरक्षण : काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना केली धक्कबुक्की ( व्हिडीओ)

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना संतप्त स्थानिकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. जमावाने खैरेंविरोधात घोषणाबाजीही केली. जमावाच्या तीव्र भावना बघून अखेर खैरे यांना माघारी परतावे लागले.

सोमवारी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे मराठा समाजाच्या नेत्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. दुपारी तीनच्या दरम्यान कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाकडे मोर्चेकरी निघाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून उडी मारली. त्यांचा तेथे मृत्यू झाला.

काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. शिंदे कुटुंबियांना मदत द्यावी आणि सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी केली जात होती. जिल्हा प्रशासनानेही या मागणीची दखल घेत शिंदे कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच त्यांच्या भावालाही नोकरी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर शिंदे यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला. सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार चंद्रकांत खैरेही तिथे पोहोचले. मात्र, स्थानिकांनी त्यांना विरोध दर्शवला. जमावाने त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. अखेर जमावाच्या भावना लक्षात घेता खैरे यांना बंदोबस्तात तिथून बाहेर काढण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत