मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही : रामदास आठवले

खोपोली : रायगड माझा ऑनलाईन 

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - रामदास आठवले

मराठा आरक्षण न्यायलायत टिकणार नाही असं विधान केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची आग्रही भूमिका असल्याचंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

खोपोली येथे जिल्हा युवक मेळाव्यादरम्यान पत्रकार परिषदमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे. तर मंदिरं, पुतळे बांधले नाहीत तर मतं मिळणार नाहीत असंही आठवले म्हणाले. त्याचबरोबर भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती भाजपाला फायदेशीर असल्याचा उल्लेखही त्यांनी या परिषदेत केला.

यावेळी त्यांनी राम मंदिर वादावरही भाष्य केलं. अयोध्येतील जागा ही बौद्ध समाजाची असून ती वादग्रस्त आहे. त्याबदल्यात आमहाला दुसरीकडे जागा मिळावी. तर याआधीही त्यांनी या विषयावर विधान केलं होतं.

‘अयोध्या तर बुद्धाची भूमी’

राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘इतिहास पहिला तर ती भूमी बुद्धाची आहे . जर सर्वधर्मसमभावाची भूमिका घ्यायची असेल तर त्याठिकाणी बुद्ध मंदिरासाठीही जागा दिली पाहिजे. कोर्टाचा निकाल येईपर्यंत मंदिर बांधण्याची घाई करू नये. राम मंदिर बांधावे पण मुस्लिमांवर दबाव टाकून बांधू नये, असा सल्ला आठवलेंनी दिला होता. ते मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत