‘मराठा आरक्षण’ मंत्रिमंडळ उपसमितीचे राज्य मागास वर्ग आयोगास निवेदन

मुंबई : रायगड माझा वृत्त 

राज्य शासनाने नेमलेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आज, शुक्रवार दि. २७ रोजी राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड व सदस्य सुवर्णा रावल यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने निवेदनही देण्यात आले. 

यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल तातडीने राज्य शासनास द्यावा, अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, आदींचा समावेश होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत