मराठा आरक्षण रद्द करा : इम्तियाज जलील

औरंगाबाद : रायगड माझा ऑनलाईन 

मराठा आरक्षण रद्द करा- इम्तियाज जलील

मराठा आरक्षणाविरोधात एमआयएमने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती द्या. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. मराठा आरक्षण रद्द करून मराठा आणि मुस्लीम समाजाला विभागून आरक्षण देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मात्र, जलील यांची ही याचिका न्यायालयात टिकणार नसल्याचे मत मराठा आरक्षणाचे समर्थक आणि अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी व्यक्त केले.

भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकसारखेच विषारी असून मराठा आरक्षण हे एक प्रकारचे ‘गाजर’ आहे. मराठा समाज सध्या त्यांची वाहवा करत असला तरी पडद्यामागील सत्य त्यांना लवकरच समजेल, अशी प्रतिक्रियाही इम्तियाज जलील यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत