मराठा क्रांती मोर्चाचे सांगलीत कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन

सांगली : रायगड माझा वृत्त 

राज्यभर मराठा क्रांती आंदोलनाचा भडका उडाला असून आज सांगली कृष्णाकाठी मराठा क्रांतीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पाण्यात उड्या घेत प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले. 

 

पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात, अनेक होड्या, लाईफ जॅकेटसह आपत्ती निवारणाची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
पाण्यात उभे राहून कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवायची, अशी शपथ घेतली.

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून आंदोलन पेटलेले असताना सांगली, मिरज, कुपवाड शहरात महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे क्रांती मोर्चानेच शांततेचे आवाहन केले होते.

तथापी, कायगाव येथील काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले असून त्याचे पडसाद सांगलीतही उमलटले. कालपासून जिल्हाभर आंदोलन तीव्र करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा दक्ष होती. सकाळपासूनच कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह दोन उपाधीक्षक, शहरातील सर्व निरीक्षक यांच्यासह सुमारे चारशे पोलिस बंदोबस्तात तैनात होते.  दहा वाजता क्रांती मोर्चाच्या क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नदीकडे कूच केली. आंदोलन शांततेत करू, अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यामुळे ठराविक कार्यकर्त्यांना नदीत प्रवेश देण्यात आला.

त्यात डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, नितीन चव्हाण आदी कार्यकर्ते कमरेएवढ्या पाण्यात उतरले. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचा लढा अखेरच्या श्‍वासापर्यंत सुरु ठेवण्याची शपथ घेतली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत