मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर नारायण राणे संतापले

मुंबई: रायगड माझा 

नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या ठरावावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करु नका, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला होता. यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी अशाप्रकारचा निर्णय घ्यायला कोण लागून गेले, त्यांना हा अधिकार कोणी दिला, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. मी सुद्धा मराठा समाजातील आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला आणि पदाधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा अधिकार आहे, असे राणेंनी सांगितले. यावर आता समन्वय समितीचे पदाधिकारी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत