मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढवणार

रायगड माझा वृत्त 

मराठा क्रांती ठोक मोर्चाने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाचा व्हावा अशी भूमिका आता मराठा मोर्चाने घेतली आहे. त्यासाठी 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षणानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारच्या भूमिकेवर समाधानी नाही. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहे.आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले असल्याचा आरोप मराठा क्रांती मोराचाचा आहे. “गेल्या 35 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून फक्त राजकीय फायद्यासाठी सर्वच पक्षाने वापर केला जातोय. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळे ठोक मोर्चा येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे”, अशी माहिती मराठा मोर्चातर्फे देण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत