मराठा समाजाला आरक्षण देण्यास ५२ टक्के ओबीसींचा विरोध

पुणे :रायगड माझा ऑनलाईन 

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत, त्या मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, परंतु सध्याच्या भाजप सरकारने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये, अशी मागणी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने पत्रकार परिषदेत केली आहे.

या पत्रकार परिषदेला फेडरेशनचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, संघटक सचिन माळी, सपना माळी,  धनगर समाजोन्नती मंडळाचे प्रवक्ते शिवाजी दळणर, पुणे जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष अनिल धायगुडे आणि सुधीर पाषाणकर उपस्थित होते.

लिंगे म्हणाले की, सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग या नावाचा प्रवर्ग करून ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याचा घाट चालू आहे. वेगळा प्रवर्ग देऊन दिलेले आरक्षण ५० टक्केच्यावर जाणार असल्याने ते न्यायालयात रद्द होणार आहे. भाजप- शिवसेना सरकारकडून शब्दच्छल करून मराठा आणि खऱ्या ओबीसींची दिशाभूल केली जात आहे. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली ठोस भूमिका जाहीर करावी तसेच, किती टक्के आरक्षण देणार हे ही जाहीर करणे गरजेचे आहे. ५२ टक्के ओबीसींच्या जोरावर भाजप-सेना सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आले आहे. परंतु आगामी काळातील निवडणूकांमध्ये, शब्दच्छल करणाऱ्या, मराठासह ओबीसी समाजाची दिशाभूल करणाऱ्या या सरकारला ओबीसी समाज मतदान करणार नाही, असा इशाराही लिंगे यांनी यावेळी दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत