मराठी माध्यमाच्या भुगोलाच्या पुस्तकात चक्क गुजराती भाषा

रायगड माझा वृत्त:

नागपूर : मराठी माध्यमातील सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

याबाबतचे प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले. आज (शुक्रवार) विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यावर मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर करण्यात येणार होता. मात्र, यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमातील इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहात निदर्शनास आणून दिला.

दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची भाषा करणाऱ्या भाजप सरकारच्या काळात मराठी पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेत दोन पाने लिहिलेली आढळली आहेत. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्राने आपला अभिमान गुजरातकडे गहाण ठेवला का, असा सवालही तटकरे यांनी यावेळी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत