मराठी रंगभूमीवर ‘आलिशान’ हे ब्रॉडवे स्टाईल नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

रायगड माझा वृत्त :

 

मुंबई, 19 जुलै : ‘आलिशान’ या नव्या भव्यदिव्य नाटकाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली. क्षितीज झारापकर दिग्दर्शित हे नाटक ब्रॉडवे स्टाईलने सादर करण्याचा त्यांचा मानस आहे. या नाटकासाठी अाधुनिक तंत्रज्ञानासह, उत्तम संगीत आणि प्रकाशयोजनेचा वापर केला जाणार आहे.न्यूज18लोकमतशी बोलताना दिग्दर्शक क्षितीज झारापकर म्हणाले, आम्ही नाटकं घेऊन जेव्हा अमेरिकेत जायचो, तेव्हा तिथली ब्राॅडवे नाटकं पाहिली आहेत. तेव्हाच डोक्यात हा कीडा वळवळला. गावातला एक भाजी विक्रेता तरुण शहरात एका माॅडेलचं पोस्टर पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. आणि मग सुरू होतात तिला मिळवण्याचे प्रयत्न.

या नाटकात 8 मुख्य कलाकार आहेत. आणि एकूण 20-22 कलाकार असतील. बाॅडवे म्हणजे नाट्य, संगीत, भव्यता, वास्तव सगळ्याचा मिलाप. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होतोय. त्यासाठी एलईडीचा नेपथ्य म्हणून  वापर केला जाईल.एलईडीसाठी नाटकातले काही सिन्स शूट केले जातील.

‘आलिशान’ या भव्य दिव्य नाटकाच्या संगीताची जबाबदारी राष्ट्रीय पुरस्कार विजेता संगीतकार शैलेंद्र बर्वेवर टाकण्यात आलीय. हे नाटक म्हणजे आपल्यासाठी एक मोठं चॅलेंज असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

या नाटकातील तब्बल सहा गाणी कोरिओग्राफ करण्याची जबाबदारी नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्यवर टाकण्यात आलीय. हे नाटक आपली स्वप्नपूर्ती करणारं असेल असं त्याला वाटतंय.नाटकातले कलाकार अजून नक्की व्हायचेत. नाटक दिवाळीत रंगभूमीवर येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत