मराठ्यांना आरक्षण द्या, घटनादुरुस्तीसाठी आमचा पाठिंबा – शरद पवार

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त 

आरक्षणाच्या घटना दुरुस्तीसाठी सरकार तयार असल्यास मी स्वत: पुढाकार घेईन असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी पूर्ण करणं अशक्य नाही. त्यामुले राजकारणमध्ये न आणता प्रश्न सुटावा यासाठी आपण प्रयत्न करु असंही ते म्हणालेत. तर मुख्यमंत्री बदल हा भाजपचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यात मराठा- ब्राम्हण हा वाद आणण्याची गरज नाही, असंही पवार म्हणाले आहेत.

आघाडी सरकार असताना आम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला असता पण आचारसंहितामुळे आम्हाला मर्यादा आल्या. पण आज जे सत्तेवर आहेत, त्यांनी पूर्वी काही आश्वासन दिली होती त्याचं काय झालं असं विचारत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे अभिवचन सरकारनी दिलं. त्यामुळे सरकार काहीतरी करेल अस वाटत होतं. पण मुख्यमंत्री आणि सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण होत नाहीत म्हटल्यावर, तरुणाई आक्रमक झाली आणि आंदोलनाची ठिणगी पडली असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या विधानांमुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चिघळलं. त्यांच्या वक्तव्यांमुळे आगीत तेल टाकलं. त्यामुळे सगळा महाराष्ट्र पेटून उठला. पण कायदेशीर अडचणी असल्या तरी त्याला पर्याय आहेत. केंद्रातही त्यांची सत्ता आहे. त्यामुळे घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आरक्षण मागण्या पूर्ण करणं शक्य आहे.

आर्थिक निकषांवर आरक्षण मिळणं हे चुकीच नाही. त्यामुळे शिवनसेना आणि भाजप एकत्र काम करतात. अशात सेना सूचना करत असेल तर त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं म्हणत पवारांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. तर मी चौदा निवडणुका लढलो आहे पण चंद्रकांत पाटील यांना अजून निवडणूका लढायच्या आहेत, त्यांना अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत