मर्जीनुसार काम नाही, मग बदली !

रायगड जिल्हा परिषद च्या आरोग्या खात्यातील प्रकार
 श्रीवर्धन :श्रीकांत शेलार
वरिष्ठांच्या  मर्जीनुसार नाही वागलो की त्याचा वचपा काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी अनेक पराक्रम करतात. याचाच एक फटका रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बसला आहे. पैशाच्या गैरव्यवहाराला विरोध करणाऱ्या एका कर्मचार्याची बदली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने केली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर बदली साठी, सुट्ट्या मंजुरीसाठी, पगार काढण्यासाठी पैसे मागितल्याचे आरोप झाले आहेत. मात्र कारवाई च्या भीतीने आरोग्य खात्यातील कुणी अधिकारी व कर्मचारी पूढे येण्यास धजावत नाही. त्यामुळेच या अधिकाऱ्याचे फावले आहे. त्यातच आता आरोग्य खात्याच्या संभापती व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साथ लाभली असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हा आरोग्य खात्यात दरवर्षी करोडो रुपयांचा निधी येतो. त्याची ‘विल्हेवाट’ लावण्यासाठी अनेक क्लृप्त्या अधिकाऱ्यांकडे असतात व त्यालाच लोकप्रतिनिधींना खास ‘टक्केवारी’ ठरली असते. अशाच लाखोंच्या टक्केवारी ला विरोध केल्याने त्याला बदलीची शिक्षा मिळाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बदली ची ऑर्डर काढल्यानंतर एकाच दिवसात जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारींनी देखील कोणतीही शहानिशा न करता सही केली. त्यामुळेच जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य सभापती यांना आता थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत आहे. आजपर्यंत अनेक जिल्हा आरोग्य अधिकारी व सभापती होऊन गेले मात्र सध्याचे अधिकारी व प्रतिनिधी पैशाने हव्यासलेले असून लोकहिताच्या कामासाठी बगल देत असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याच्या आरोग्य खात्यातील अनेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.
भ्रष्टाचारास विरोध केलेल्या या कर्मचाऱ्याची बदली थेट जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात केली आहे व त्याजागी आपल्या मर्जीनुसार काम करणाऱ्या नवख्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा मानस असल्याचे समजले. मात्र त्याने या बदली ला विरोध दर्शवला आहे.   रायगड जिल्हा परिषदेत असा छुपा व अप्रत्यक्ष भ्रष्टाचार रोजच होतो. अशा कामासाठी वरीष्ठ अधिकारी व निवडून दिले लोकप्रतिनिधी यांची जोडी बनली तर विकास हा कागदावरच राहणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी असलेले डॉ सचिन देसाई  यांच्या दुर्लक्ष मुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. अनेक ठिकाणी डॉ व कर्मचारी नसल्याचे दिसते मात्र त्यासाठी हे महोदय फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसते. किंबहुना जिल्हा लोकप्रतिनिधींनी देखील मूलभूत अशा आरोग्य व्यवस्थेकडे कानाडोळा केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी ची मागणी केली जाते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत