मलई-बोर्ली मार्गावर एसटी बसचा अपघात; शाळकरी मुले थोडक्यत बचावली; १७ जखमी

म्हसळा : निकेश कोकचा
म्हसळा तालुक्यातून धनगरमलई मार्गे बोर्ली जाणाऱ्या एसटीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. या अपघातामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांत इतर प्रवासी चालकाच्या प्रसंगवधनाने थोडक्यात बचावले असून १७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

गुरुवार दि 22 फेब्रुवारी रोजी बसचालक गौतम कांबळे सकाळी ९च्या सुमारास आपल्या ताब्यातील म्हसळा धनगरमलई मार्गे बोर्ली हि एसटी बस घेऊन निघाले. धनगरमलाई परिसरात आल्यावर एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाला असल्याचे चालक जाधव यांच्या निदर्शनात आले. या नंतर चालक जाधव यांनी सदर एसटी रस्त्याचा बाजूला दाबल्याने मोठा अपघात टळला असून शाळकरी विद्यार्थ्यांसह 17 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीना बोर्ली येथील प्राथमिक रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत