मसूरकरांचा पत्ता कट, तटकरेंच्या मुलाला उमेदवारी

निष्ठने काम करूनही पक्ष विचार करीत नाही

  • मसूरकरांचा पुन्हा पत्ता कट, तटकरेंच्या मुलाला उमेदवारी
  • निष्ठने काम करूनही पक्ष विचार करीत नाही
  • मसुरकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर डागलीतोफ
  • कोकण विधानपरिषद मतदारसंघातून निवडणूक लढविणार होते
  • दत्तात्रेय मसुरकर राष्ट्रवादीच्या निर्णयावर नाराज

खोपोली : रायगड माझा वृत्त

अजून किती दिवस वाट  पाहायची.. ३५-४० वर्षे  निष्ठने काम करूनही पक्ष विचार करीत नाही ? हे कितपत सहन करायचे असा  उद्विग्न  सवाल करत विधान परिषदेची उमेदवारी नाकारलेल्या खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर तोफ डागली.

खोपोलीचे माजी नगराध्यक्ष आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वजनदार नेते  दत्ता मसुरकर  हे कोकण स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते.    मसुरकर यांचे शरद पवार यांच्याशी निकटचे संबंध राहिले आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपली निवडणूक लढण्याची इच्छा देखील व्यक्त केली  होती. पक्षश्रेष्ठींनी त्याला हिरवा कंदील  दिला होता. त्यानुसार मसुरकर यांनी गाठीभेटी घेण्यास सुरवात केली होती उमेदवारी अर्ज देखील रत्नागिरीहून आणला होता. मात्र अचानकपणे सूत्र हलली आणि मसुरकर यांचा पत्ता कट करत अनिकेत तटकरे यांना हि उमेदवारी देण्यात आली.

मसुरकर हे एक वजनदार नेते आहेत.  नगराध्यक्ष महासंघाच्या माध्यमातून कोकणासह राज्यभरातील नगरपरिषद पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क आहे त्यांना जात काळ नाराज ठेऊन  या निवडणुकीत यश मिळविणे किमान कोकणात तरी राष्ट्रवादीला अवघड जाईल .

 

 

 

 

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत