महडच्या अष्टविनायक मंदिरात गणेश जन्मोत्सव साजरा; उत्सवात कडधान्ये रांगोळी ची भर; भक्तातांचे वेधले लक्ष्य

खोपोली : समाधान दिसले

गणपती उत्सव हा मराठी महिन्यातील माघ महिन्यात येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करण्यात येतो. विशेष करून महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायक मंदिरात भाविक भक्ताची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यांने या वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी या ठीकाणी यात्रे सारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झालेले होते. मुंबई-पुणे महामार्गावर असलेले अष्टविनायका पैकी महड गावातील वरद विनायक येथे गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

या उत्सवाच्या निमित्ताने भाविक भाक्तांसाठी पाण्याची आणि हाल फाटा ते  देवस्थान महड येथे वाहनांची व्यवस्था करण्यात आली. वर्षातून एकदाच माघी गणपती उत्सव साजरा होत असल्यामुळे कर्जत, खालापूर, पनवेल, अश्या विविध ठिकाणी भक्तगण दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आले होते.

मंदिरात भव्य दिव्य अशी कडधान्याच्या रांगोळीने भक्तगणांनाचे मन आकर्षिले जात होते. अशी सुंदर रांगोळी काढण्यासाठी १३० कडधान्यांचा वापर करण्यात आला. तसेच ह्या रांगोळीसाठी २० तास एवढा कालावधी लागला. या रांगोळीसाठी शाबुदाणे, मूगडाळ, मसुरडाळ, मटकी, नाचणी, काळे तीळ, तांदूळ पिवळी मोहरी अदि कडधान्यांचा वापर करण्यात आला. या रांगोळी मध्ये गणपती असून भगवान शंकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचाही फोटो ह्या फुलांच्या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत