महड येथे महाप्रसादातून विषबाधा, 3 लहान मुलांचा मृत्यू

खालापूर : रायगड माझा वृत्त

रायगडमधील महड येथे पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पनवेलमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहे.

खालापूर तालुक्यातील महड येथील माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.  ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, तोपर्यंत  ३ लहान मुलांचा मृत्यू झाला. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेलमधील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत