महड वरदविनायक येथे सुपारीच्या झाडातून प्रकटला गणपती

खोपोली : समाधान दिसले

अष्टविनायकापैकी एक गणपती हा खालापूर तालुक्यातील महड येथे असल्याने या ठिकाणी वरदविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दररोज असंख्य भाविक मोठ्या श्रध्देने संख्येने येत असतात. परंतु मंगळवार 6 नोव्हेंबर रोजी याच गावात शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार व कामगार नेते हनुमंत पिंगळे यांच्या गार्डन मधील एका सुपारीच्या झाडातून हुबेहुबे गणपती बाप्पा प्रकटल्याने येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती, तर या झाडातील गणपती बाप्पाची हनुमंत पिंगळे पुजा यांनी केली.

निसर्गात दैवी कृपेने अनेक अदभूत प्रकार घडत असल्याने त्याला साक्षात्कार असे मानले जाते. मात्र खालापूर तालुक्यात अष्टविनायकापैकी एक गणपती क्षेत्र हे महड येथील वरदविनायकांचे असून या ठिकाणी मोठ्या श्रध्देने गणेश भक्त गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात, परंतु याच वरदविनायक गणपती बाप्पाच्या पावन भूमीत मंगळवार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी. शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार तथा कामगार नेते ह.भ.प.हनुमंत पिंगळे यांच्या गार्डनमध्ये सुपारी झाडातून गणपती बाप्पा प्रकटल्याने हा साक्षात्कार घडल्याने या सुपारी झाडातील गणपती बाप्पाला बघण्यासाठी व दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. तर या गणपती बाप्पाची हनुमंत पिंगळे, अक्षय पिंगळे व अजय पिंगळे यांनी मनोभावे पूजा करीत गणपती बाप्पा चरणी साकडे घालत सर्वाना सुखी ठेव अशी प्रार्थना केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत