महड विषकांड : सुनेनेच रचला कुटुंब संपविण्याचा कट

खालापूर : मनोज कळमकर

महडच्या  विषबाधा प्रकरणाला  वेगळी कलाटणी मिळाली आहे.  संपूर्ण कुटुंब संपविण्याच्या द्वेषातून माने यांची  नात्याने सून लागणाऱ्या   प्रज्ञा सुरवशे   हिनेच जेवणात विष कालवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . पाच जणांचा मृत्यू आणि अनेकांना  अत्यवस्थ करणाऱ्या या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता. 

महड येथील सुभाष माने यांच्या घरी वस्तूशांतीचा कार्यक्रम होता. नातेवाईक जमले होते.  जेवणाचा कार्यक्रम सुरु होता. आणि अचानक अनेकांना उलट्या होऊ लागल्या. बघता बघता प्रकरण  गंभीर झाले. अनेकांना उपचारासाठी खोपोली, पनवेल वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन चिमुरड्यांचा यात बळी गेला. दोघांचा  उपचारदरम्यान मृत्यू झाला. या घटनेने खालापूरसह संपूर्ण रायगड जिल्हा हादरला. रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर  तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपासाची सूत्रे वेगाने फिरली . आणि सुरवातीला निव्वळ विषबाधा असणारे  हे प्रकरण गंभीर हत्याकांड असल्याचे निष्पन्न झाले आहे.  या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेली महिला हि माने कुटुंबाची सून  आहे.  प्रकरणातील आरोपी असलेल्या महिलेने कौटुंबिक द्वेषातून हे कांड  घडविले आहे. आरोपी प्रज्ञा सुरवशे  हिचे यापूर्वी शिंदे  कुटुंबात लग्न झाले होते ,पण ते मोडले गेले. शिंदे, आणि माने कटुंबामुळे हे लग्न मोडले असल्याचा तिचा समज होता. माने, शिंदे,कुटुंबातील महिला  तिला  जेवण करता येत नाही, तू काळी  आहेस या कारणावरून सतत हिणवत होत्या . त्यातून आपले हे लग्न सुद्धा मोडेल  या भीतीमुळे तिने  सर्व नातेवाईकांना संपविण्याचा घाट घातला .

तिला ज्यांच्यावर राग होता ते सुभाष माने, सासू सिंधू सुरवशे, नणंद उज्वला कदम आणि अलका शिंदे या लवकर जेवल्यामुळे प्रज्ञाला त्यांना मारण्याची संधी मिळाली नाही. परंतु शिंदे कुटूंबातील मुले  जेवायला आल्यावर तिने वरणाच्या बादलीत फोरेट विषारी द्रव्य टाकले आणि पुढचे विषबाधा कांङ घङले.

 

सर्वाना सुन्न करणाऱ्या करणाऱ्या या घटनेचा पोलिसांनी तत्परतेने तपास  लावला आणि आरोपी प्रज्ञा शिंदे हिला अटक केली आहे. नात्यातील द्वेष कोणत्या थराला  जाऊ शकतो याचे वाईट उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येईल .

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत