महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत अक्षयने सलमानला टाकले मागे ;शाहरुख चा यात समावेश नाही

नवी दिल्ली :रायगड माझा वृत्त 

फोर्ब्सने जगातील सर्वात महागड्या १०० सेलिब्रिटीजची यादी जाहीर केली आहे. या यादीत सलमान खान आणि अक्षयकुमारचा समावेश करण्यात आला असून महागड्या सेलिब्रिटीजच्या या यादीत अक्षयने सलमानला मागे टाकले आहे. आश्चर्यची बाब म्हणजे या यादीत किंगखान शाहरूखचा समावेश करण्यात आलेला नाही. 

फोर्ब्सच्या यादीत शाहरूख खानचं नेहमीच नाव असतं. मात्र यंदा पहिल्यांदाच त्याला या यादीतून वगळण्यात आलं आहे. या यादीत अक्षयकुमार ७६ व्या स्थानी असून सलमान ८२ स्थानी आहे. २०१७ मध्ये शाहरूखला या यादीत ६५ वे स्थान मिळाले आहे.

फोर्ब्सनुसार अक्षयकुमारने या वर्षी ३.०७ अब्जची कमाई केली आहे. या वर्षी आलेल्या अक्षयच्या ‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथे’ने चांगली कमाई केली होती. शिवाय २० ब्रँडमध्ये काम केल्यानेही अक्षयला चांगली मिळकत झाल्याचं फोर्ब्सने नमूद केलं आहे.

तर सलमनाने यंदा २.५७ अब्ज रुपये कमावल्याचं फोर्ब्सने स्पष्ट केलं आहे. ‘टायगर जिंदा है’मुळे सलमानच्या कमाईत वाढ झाली आहे. शिवाय त्याने जाहिरातीतूनही भरपूर पैसा कमावला असल्याचं फोर्ब्सने नमूद केलं आहे.

जगातील शंभर महागड्या सेलिब्रिटीजच्या या यादीत अमेरिकेतील बॉक्सर फ्लॉयड मेवेदरने अव्वल स्थान मिळवलं आहे. त्याने यंदा १९.४९ अब्ज रुपयांची कमाई केली आहे. तर या यादीत जॉर्ज क्लूनीने दुसरं,काइली जेनेरने तिसंर, ज्युडी शिंडलीनने चौथं तर ड्वेन जॉन्सनने पाचवं स्थान पटकावलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.