महाडमध्ये शेतकऱ्याने केले गाईचे ओटी भरणे

रायगड : प्रसाद पाटील (प्रतिनिधी)

महिलांच्या ओटी भरणीचे सोहळे सर्वत्र साजरे होतात. मात्र महाड तालुक्यातील बिरवाडी येथे राहणाऱ्या अतिष पवार या शेतकऱ्याने चक्क आपल्या गाईचा ओटी भरण्याचा सोहळा साजरा केला.

यावेळी गाईचे शिंग आणि पायात फुल्लांचे गजरे, डोक्यात शिरपेच तसेच पाठीवर शाल टाकुन गाईला सजावण्यात आले होते. तसेच परीसरातील महिलांनी या गाईला ओवाळले. घरातील गाईचेच हे वासरू असल्याने घरातील सदस्याप्रमाणे ही गाय लहानाची मोठ्ठी झाली आहे. त्यामुळे तीच हे गोडकौतुक करीत असल्याचे कुटूंबीयांचे म्हणणे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत