महाड तालुक्यात एकवीसपैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध

महाड : मयुरी खोपकर

महाड तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २७ मे रोजी होणार असून काल सोमवारी छाननीच्या दिवशी यापैकी पाच ग्रमपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आणखी काही ग्रमपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.  या पाच ग्रमपंचायतीमध्ये बावले ग्रमपंचायतीमध्ये सरपंच आणि चार सदस्य, चापगांव ग्रमपंचायतीमध्ये सरपंच आणि पाच सदस्य, कोकरे तर्फे नाते सरपंच आणि तीन सदस्य, काचले ग्रमपंचायतीत सरपंच आणि पाच सदस्य आणि चांढवे खुर्द ग्रमपंचायतीमध्ये सरपंच आणि पाच सदस्य  बिनविरोध निवडून आले आहेत.
निवडणूक होणार्या या ग्रमपंचायतींमध्ये कोथुर्डे सरपंचपदासाठी पाच तर सदस्यपदासाठी १७ उमेदवारी अर्ज, तेलंगे सरपंचपदासाठी तीन आणि सदस्यपदासाठी ९ उमेदवारी अर्ज, नांदगांव खुर्द  सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी ११ उमेदवारी अर्ज,पडवी सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी ६ उमेदवारी अर्ज, किये सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी ११ उमेदवारी अर्ज, घुरूपकोंड सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी ५ उमेदवारी अर्ज, तेलंगे मोहोल्ला  सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी १५ उमेदवारी अर्ज, रावढळ  सरपंचपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी १२ उमेदवारी अर्ज, टोळ  बुद्रुक सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी ७ उमेदवारी अर्ज, शेल सरपंचपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी १२ उमेदवारी अर्ज,तळोशी सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी ७ उमेदवारी अर्ज, कोंडीवते सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी ११ उमेदवारी अर्ज,किंजळोली  खुर्द  सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी ११ उमेदवारी अर्ज, चांढवे बुद्रुक सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी १० उमेदवारी अर्ज या ग्रमपंचायतींमध्ये निवडणुका होणार असल्या तरी उद्या १६ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून यापैकी आणखी किती ग्रमपंचायती बिनविरोध होतात, हे त्याचदिवशी स्पष्ट होईल.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत