महाड तालुक्यात 17 पैकी 13 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

 

महाड : सिद्धांत कारेकर

महाड तालुक्यात 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले. या ग्रामपंचायत निवडुनिकीच्या 17 ग्रामपंचायती पैकी 13 ग्रामपंचायती वर शिवसेनेचा भगवा फडकला असून, या मध्ये 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात तर 2 ग्रामपंचायतीवर काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, ढोल तश्याच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत